मोदींच्या मांडीत बसण्याशिवाय पर्याय नाही !

मोदींच्या मांडीत बसण्याशिवाय आपल्याकडे आता कोणताही पर्याय नाही, दुसऱ्यांची कामं आपण बघितली आहेत

Updated: Jun 2, 2016, 06:44 PM IST
मोदींच्या मांडीत बसण्याशिवाय पर्याय नाही ! title=

नवी दिल्ली : मोदींच्या मांडीत बसण्याशिवाय आपल्याकडे आता कोणताही पर्याय नाही, दुसऱ्यांची कामं आपण बघितली आहेत, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी केलं आहे. मोदींविषयी विचारलेल्या प्रश्नावर ओम पुरी यांनी हे वक्तव्य केलं आहे, पण ओम पुरींचं हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधानांचं कौतुक आहे का टोमणा आहे याबाबत मात्र चर्चा सुरु झाल्या आहेत. 

प्रोजेक्ट मराठवाडा या चित्रपटाच्या निमित्तानं ओम पुरी दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रोजेक्ट मराठवाडा हा चित्रपट मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्यं करणारा आहे. या चित्रपटामध्ये ओम पुरी यांनी तुकाराम नावाच्या शेतकऱ्याची भूमिका केली आहे.