'पर्सनल' ट्विटर अकाऊंटवरून 'परराष्ट्र मंत्री' म्हणून स्वराज यांची माघार

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटरच्या बायोडेडामधली माहिती बदललीय. इतकंच नव्हे, तर हे ट्विटर अकाऊंट 'पर्सनल अकाऊंट'मध्येही बदलण्यात आलंय. 

Updated: Jul 23, 2015, 04:18 PM IST
'पर्सनल' ट्विटर अकाऊंटवरून 'परराष्ट्र मंत्री' म्हणून स्वराज यांची माघार title=

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटरच्या बायोडेडामधली माहिती बदललीय. इतकंच नव्हे, तर हे ट्विटर अकाऊंट 'पर्सनल अकाऊंट'मध्येही बदलण्यात आलंय. 

कालपर्यंत देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून ओळख सांगणाऱ्या सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटरवरून 'परराराष्ट्र मंत्री' ही ओळखच काढून घेतलीय. विरोधकांनी सुषमांच्या राजीनाम्यासाठी टीकेची झोड उठवलेली असताना सुषमा स्वराज यांनी असा बदल केल्यानं एकच खळबळ उडाली.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सुषमा स्वराज यांचं ट्विटर हँडल खाजगी आहे आणि त्या नेहमीचं आपला बायोडेटा बदलत असतात असं सांगण्यात आलंय.

विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर प्रथमच सुषमांनी आपल्या बायोडेटामध्ये असा बदल केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.