श्रीनगर : जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे शुक्रवारी फुटीरतावाद्यांच्या गटांनी काश्मिरी पंडित आणि सैनिक कॉलनी विरोधात आंदोलनाच्यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचा झेंडा फडकवला. त्यावेळी फुटीरतावाद्यांनी 'जिवे जिवे पाकिस्तान' अशा घोषणादेखील दिल्या.
फुटीरतवादी नेते मीरवाइज उमर फारुखही यावेळी आंदोलकांसोबत होते. हिंसक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.
काश्मिरात सैनिक कॉलनीला परवानगी द्यायची का नाही यावरून पी.डी.पी आणि भाजपामध्ये वाद सुरू आहेत.
Protesters raise flags of ISIS and Pakistan in Srinagar (J&K) pic.twitter.com/2nSy9nh9mJ
— ANI (@ANI_news) June 17, 2016
Srinagar: Police use tear gas against protesters protesting against Pandits and Sainik colonies pic.twitter.com/0BFToNYDyQ
— ANI (@ANI_news) June 17, 2016