सोन्याचे दर आणखी घसरले, चांदीचीही घसरण सुरू

परदेशातील आर्थिक हालचालीमुळं स्टॉकिस्टांच्या विक्रीमुळं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी भाव 120 रुपयांनी घसरत 28,530 रुपये प्रति 10 ग्राम इतका झाला. 

Updated: Jun 29, 2014, 12:16 PM IST
सोन्याचे दर आणखी घसरले, चांदीचीही घसरण सुरू title=

नवी दिल्ली : परदेशातील आर्थिक हालचालीमुळं स्टॉकिस्टांच्या विक्रीमुळं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी भाव 120 रुपयांनी घसरत 28,530 रुपये प्रति 10 ग्राम इतका झाला. 

 

 
तसेच औद्योगिक युनिटस आणि नाणे निर्माता यांच्या कमी मागणीमुळं चांदीचा भाव 320 रुपयांनी कमी होत 44,980 रुपये किलो झाली आहे. बाजारांतील सूत्रांच्या माहितीनुसार, विदेशातील कमकुवत गोल्फमुळे स्टॉकिस्टांची विक्री आणि आभूषण निर्मात्यांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे सोने, चांदीच्या किंमतीवर त्याचा परिणाम झालाय. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा 0.14 % एवढा भाव कमी झाला असून 1315.10 डॉलर प्रति ग्रॅम इतकी आहे.     
 
दिल्लीत सोन्याची घसरण होत सोन्याची किंमत 28530 रुपये आणि 28330 रुपये प्रति 24 आणि 23 कॅरेट आहे. पूर्वीच्या भावानुसार नाणी 24,900 रुपये प्रति 8 ग्रॅम तर तयार चांदीचे भाव 320 रुपये भाव कमी होत 44980 रुपये झाले आहेत. 
दर आठवड्यास चांदी वितरणाचा भाव 120 रुपये इतका कमी होउन 44530 रुपये किंमतीचा होतोय. 
या मर्यादित कारभारात चांदीच्या नाण्यांची किंमत 79000 ते 80000 रुपये प्रति गॅम झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.