नवी दिल्ली : दिल्ली सचिवालयावर सीबीआयने छापा मारल्यानंतर माझ्या घरावरही छापा मारवा. त्यांना असंख्य मफलर शिवाय काहीच हाती लागणार नाही, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
रिक्षा परवाना घोटाळयात 3 अधिका-यांच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या घोटाळयाचा तपास सीबीआयकडे देण्यात येईल असे केजरीवाल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशामुळे माझ्या कार्यालयावर छापे मारण्यात आले. अशीही टीका त्यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांच्या पोशाखात मफलर महत्त्वाचा घटक झालाय. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानही आम आदमी पक्षाने मफलर मॅन परतला अशी प्रचार मोहिम राबवली होती.