ओवैसी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

भडकाऊ भाषण देण्याच्या आरोपावरून मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना बुधवारी आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मलनगरमध्ये मॅजिस्टेटसमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 9, 2013, 03:09 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद
भडकाऊ भाषण देण्याच्या आरोपावरून मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना बुधवारी आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मलनगरमध्ये मॅजिस्टेटसमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
न्यायालयातून त्यांची रवानगी थेट आदिलाबादच्या जिल्हा न्यायालयात करण्यात आलीय. याअगोदर पोलिसांनी ओवैसी यांची मंगळवारी रात्रभर चौकशी केली. चौकशी अपूर्ण असल्यानं पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी मंगळवारी अटक करण्यात आलो होती. 24 डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी दाखल झाल्यानंतर, अकबरुद्दीन ओवेसी इंग्लंडमध्ये परागंदा झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या मदतकार्यात सहकार्य करत नसल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. इंग्लंडहून हैदराबादेत परतलेल्या ओवेसीने प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्येच अटक करण्यात आली.