पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा

 पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

Updated: Aug 16, 2016, 06:12 PM IST
पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा title=

पठाणकोट :  पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट रोजी असतो. या फुग्यावर मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र असून उर्दूमध्ये 'जश्न-ई-अझादी मुबारक' असं लिहिलंय. पाकिस्तानच्या निर्मिती दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी हवेत फुगा आणि ध्वज सोडल्यानंतर तो भारतीय हद्दीत आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

'पाकिस्तानमधून हवेत सोडण्यात आलेला ध्वज व फुगा येथील फतेपूर गावाच्या हद्दीत येऊन पडला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे. परंतु, यामध्ये काळजी करण्याचे कारण नाही', पोलिस अधीक्षक राकेश कौशल म्हणाले.