पूँछ : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पूँछ सेक्टरमधील दिगवार भागात पाकिस्तानी सैन्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. पाकिस्तानच्या बाजूने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून तोफांचा मारा सुरु होता.
पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे दिगवार परिसरात राहणा-या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. महिन्याभरात पाकिस्तानकडून चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय.