ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!

पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

Updated: Jan 5, 2016, 05:19 PM IST
ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!  title=

नवी दिल्ली : पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

हल्याला प्रत्यूत्तर देताना सुरक्षा दलाकडून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक वस्तू आणि वापरलेले फोन हस्तगत करण्यात आलेत. हे सगळे पुरावे 'पाकिस्तान'कडेच बोट दाखवत आहेत. 

चौकशीअंती दहशतवादी जवळपास 25 किलोची विस्फोटक घेऊन भारतात आल्याचं समजतंय. दहशतवाद्यांकडे जी आधुनिक हत्यारं सापडली आहेत तेदेखील पाकिस्तानातच बनलेत. वापरलेल्या फोनचे कॉल्स दहशतवाद्यांनी पाकिस्तानात संपर्क साधल्याचं सांगतायत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी जे बूट चढवले होते तेदेखील पाकिस्तानच्या एका लोकल कंपनीनं बनवलेलेले आहेत. सुरक्षा एजन्सीज अजूनही या हल्याचे आणखी धागेदोरे शोधून काढण्याच्या प्रयत्नात आङेत. 
 
हा घ्या पुरावा... 
- मारले गेलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकानं पाकिस्तानच्या एपकॉट (EPCOT) ब्रँडचे बूट परिधान केले होते. हा ब्रँड पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.

- दहशतवाद्यांकडून पाकिस्तानातील क्रमांकावर केले गेलेले फोन कॉल्स

- दहशतवाद्यांकडून पाकिस्तानचे मिळालेलले क्रमांकावर

- दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेले पाकिस्तानी बनावटीची हत्यारं
 
- दहशतवाद्यांकडे सापडलेली पाकिस्तानी बॅटरी

- दहशतवाद्यांकडून सीमेपलिकडून घुसखोरी करण्याचे पुरावे
 
या पुराव्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आता पाकिस्तानची आहे. यावर आता पाकिस्तान काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.