पेशावर शाळा हल्ला : संसदेमध्ये श्रद्धांजली

पाकिस्तानमधील पेशावर शाळेत अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Updated: Dec 17, 2014, 07:01 PM IST
पेशावर शाळा हल्ला : संसदेमध्ये श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील पेशावर शाळेत अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पाकिस्तानातील पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दोन मिनिटांची स्तब्धता पाळून या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातलगांप्रती संसदेनं सहवेदना व्यक्त केली.

पाकिस्तानमधील शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारताताही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना गृहमंत्रालयाने केली आहे. सर्व शाळा, कॉलेजेस तसंच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.