नवी दिल्ली : अखिल भारत हिंदू महासभाने अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात धार्मिक भावणा दुखावल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही दोघांच्या विरोधात याचिका स्विकारली आहे.
२० डिसेंबरला एका टीव्ही शोच्या कार्यक्रमादरम्यान दोघांनी देवीच्या मंदिरात बुटं घालून प्रवेश केल्याचं दाखवलं गेलं होतं. चॅनेलकडे ही या विरोधात तक्रार देण्यात आली होती पण चॅनेलकडूनही कोणतीच कारवाई केली गेली नाही.
कोर्टाने या प्रकरणात १८ जानेवारीला साक्षीदारांना उपस्थित करण्यास सांगितलं आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्षांनी म्हटलं की पोलिसातही या विरोधात तक्रार केली होती पण कोणतीच कारवाई केली गेली नाही.