खुशखबर! पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी उतरणार

सुत्रांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयाने उतरण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण सरकारने कधीच काढून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या उपलब्धतेवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती अवलंबून असणार आहेत.

Updated: Nov 10, 2014, 03:27 PM IST
खुशखबर! पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी उतरणार title=

नवी दिल्ली : सुत्रांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयाने उतरण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण सरकारने कधीच काढून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या उपलब्धतेवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती अवलंबून असणार आहेत.
 
याआधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात 2.41 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.25 रुपयांनी कपात केली होती. सरकार 15 नोव्हेंबरला डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कपात करण्याची घोषणा करु शकतं, असं माहिती मिळते. 

ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलचे दर सातव्यांदा आणि डिझेलचे दर तिसऱ्यांदा कमी झाले आहेत. आगामी जम्मू-काश्मिर आणि झारखंड विधानसभा निवडणूक हे दर कमी होण्याचं कारण असल्याचं समजतं. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने देशातील तेल कंपन्यांना फायदा होत आहे. सरकारने डिझेल नियंत्रणमुक्त केल्याने आता पेट्रोलसह डिझेलच दर बाजारानुसार निश्चित होणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.