पेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे'

पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.

Updated: Oct 31, 2015, 07:12 PM IST
पेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे' title=

मुंबई : पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.

पेट्रोलच्या किंमतीत 50 पैसे प्रति लीटर घट करण्यात आलीय. सध्या मुंबईत पेट्रोलचे दर 68.25 रुपये प्रति लीटर आहेत. ते आज रात्रीपासून 67.75 रुपये प्रति लीटर होईल. 

डिझेलचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. यापूर्वी 15 ऑक्टोबरला सरकारी तेल वितरण कंपन्यांनी डिझेलच्या किंमतींत 95 पैसे प्रती लीटर वाढ केली होती. त्यावेळी, पेट्रोलच्या दर मात्र स्थिर राहिले होते. 

दर पंधरा दिवसांनी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरांची समीक्षा केली जाते... आणि देशातील इंधनांच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय किंमतींप्रमाणे बदल केले जातात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.