देशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं

सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.

Updated: Jun 15, 2015, 11:43 PM IST
देशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं title=

नवी दिल्ली: सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.

तेल कंपन्यांनी डिझेलचे दर प्रति लीटर 1.35 रुपयांनी घटले आहेत. तर पेट्रोलची किंमत प्रति लीटर 64 पैशांनी महाग झालंय. आज मध्यरात्रीपासून या किमती लागू होतील.

गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर तिसऱ्यांदा वाढले आहेत. एक महिन्यापूर्वी म्हणजेच 15 मे रोजी पेट्रोलचे दर प्रति लीटर 3.13 रुपयांनी आणि डिझेल 2.71 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ... यामुळं सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.