आईवर बलात्कार करणारा मुलगा अटकेत

 साठ वर्षीय आईवर बलात्कार केल्याच्या आरोपात 29 वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा आरोपी शकुनसिंह परिहार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Updated: Jun 15, 2015, 06:52 PM IST
आईवर बलात्कार करणारा मुलगा अटकेत title=

अहमदाबाद :  साठ वर्षीय आईवर बलात्कार केल्याच्या आरोपात 29 वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा आरोपी शकुनसिंह परिहार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 जूनच्या रात्रीची आहे. महिला उत्तर प्रदेशातील कानपूरची रहिवासी आहे. ती अहमदाबादमध्ये मुलीच्या घरी आली होती. तिचा मुलगा आरोपी शकुनसिंह देखील अहमदाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतो. 13 जून रोजी तो बहिणीच्या घरी गेला आणि आईला आपल्या घरी चल म्हणाला. रस्त्याने जाताना एका शेतात त्याने आईवर बलात्कार केला आणि तिला तिथेच सोडून पळून गेला.

पीडित महिलेने मदतीची याचना केली पण कोणीही तिची मदत केली नाही. तेव्हा मोठी हिम्मत करुन तिने मुलीचे घर गाठले. मुलीने आईला घेऊन पोलिसांना सर्व माहिती दिली. आरोपी त्याच्या घरुन फरार झाला होता, पोलिसांनी रविवारी त्याला त्याच्या मित्राच्या घरातून अटक केली.

पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पीडित महिलेला मुलाने केलेल्या शारीरिक - मानसिक अत्याचाराचा मोठा धक्का बसला आहे. झालेल्या घटनेबद्दल काहीही सांगण्याच्या स्थितीत ती नाही. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस अधिकारी पी.बी.राना म्हणाले, आरोपी शकुनसिंह परिहारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्ह्याच्या कारणाचा शोध घेत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.