www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 2.35 रुपये, तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 50 पैशांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आज (शनिवार) मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे.
यामुळे सर्वसामान्यांना आता महागाईचे चटके आणखी जाणवू लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यांमधील ही पेट्रोल दरवाढीची सहावी वेळ आहे, तर 17 जानेवारीपासून आतापर्यंत आठ वेळा डिझेलची दरवाढ झाली आहे.
डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर तीन ते पाच रुपयांची, केरोसीनच्या किमतीत 2 रुपये, तर एलपीजी गॅसच्या किमतीत सिलिंडरमागे 50 रुपयांनी वाढ करण्यात गरज तेलमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शुक्रवारी पत्र लिहिले आहे. इंधनांच्या किमतीत वाढ केली नाही तर सरकारला डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानापायी ९७ हजार ५०० कोटी रुपये मोजावे लागतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.