पेट्रोल पंपमालकांचा बंद मध्यस्थीनंतर मागे

देशातल्या पेट्रोल पंपमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. 

PTI | Updated: Apr 11, 2015, 09:34 AM IST
पेट्रोल पंपमालकांचा बंद मध्यस्थीनंतर मागे title=

नवी दिल्ली : देशातल्या पेट्रोल पंपमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. 

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १ महिन्याच्या आत मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.  दर महिन्याच्या एक आणि १६ याच तारखांना विक्रीदरातील चढ उतार करण्याचे ऑईल कंपन्यांनी मान्य केलेले असताना, ऑईल कंपन्या कोणत्याही तारखांना दर बदलत असल्याने पेट्रोल पंप मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते, असे पेट्रोल मालकांचे म्हणणे होते.

देशातली पेट्रलपंप आज एका शिफ्टमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. देशातील एकही पेट्रोलपंप मालक डिझेल आणि पेट्रोलची खरेदी करणार नाही, असा निर्णय घेतला होता. यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होवून पुढील दोन ते तीन दिवस त्याचे परिणाम जाणवू शकतात, अशी भीती व्यक्त होत होती.

दर महिन्याच्या एक आणि १६ याच तारखांना विक्रीदरातील चढ उतार करण्याचे ऑईल कंपन्यांनी मान्य केलेलं असताना ऑईल कंपन्या कोणत्याही तारखांना दर बदलत असल्यानं पेट्रोल पंप मालकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

यामुळे दर बदलांच्या तारखांमध्ये सातत्य आणि शिस्त आणावी आदी अनेक मागण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.