पंतप्रधानांकडून सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Dec 9, 2014, 02:41 PM IST
पंतप्रधानांकडून सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनियां गांधी यांनी छत्तीसगडमधील नक्षली हल्ला आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे वाढदिवस न साजरा करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

 पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून सोनियांना शुभेच्छा देताना म्हटले आहे, की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव त्यांना दिर्घायु आणि निरोगी आयुष्य देवो. 

काँग्रेस पक्षाकडून आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे, की सोनियांनी नक्षल आणि दहशतवादी हल्ल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 14 जवान हुतात्मा झाले होते. तर, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातएका जवान हुतात्मा झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.