'कॉल ड्रॉप'वरून पंतप्रधानांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

वारंवार होणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवलीय. याच मुद्यावरुन मोदींनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय.

Updated: Aug 26, 2015, 11:20 PM IST
'कॉल ड्रॉप'वरून पंतप्रधानांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी title=

नवी दिल्ली : वारंवार होणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवलीय. याच मुद्यावरुन मोदींनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय.

सामान्यांना प्रभावित करणारी 'कॉल ड्रॉप' समस्या दूर व्हावी यासाठी काय प्रयत्न केले जातायत? असं पंतप्रधानांनी या अधिका-यांना विचारलंय. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सोमावारी सायंकाळी झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत हे निर्देश देण्यात आलेत. देशभरातील जवळपास ९० कोटी जनता कॉल ड्रापच्या समस्येमुळे हैराण आहे.

पंतप्रधानांनी कॉल ड्रॉपच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केलीय. या समस्येवर लवकरात लवकर पावलं उचलण्याचे आदेशही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिलेत. व्हॉईस कनेक्टिव्हिटीची समस्या डेटा कनेक्टिव्हटीपर्यंत पोहचू नये, याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आलेत, असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.