मोदींच्या चहापानाला शिवसेना, मोदींनी मांडल्या आपल्या भावी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडला.

PTI | Updated: Oct 26, 2014, 09:11 PM IST
मोदींच्या चहापानाला शिवसेना, मोदींनी मांडल्या आपल्या भावी योजना title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडला.

या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘संसद आदर्श ग्राम योजना’ खासदारांपुढे मांडण्यात आल्यात. संसद आदर्श ग्राम योजनेचं प्रेझेंटेशन नितीन गडकरींनी केलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे खासदार या सभेला उपस्थित होते. 

लालकृष्ण अडवाणींच्या भाषणानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर अरूण जेटली, नितीन गडकरी यांनी योजनांची प्रेझेंटेशन केली. शिवसेनेचे खासदारही या चहापानाला उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.