मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास

मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातला भला मोठ्ठा परदेश दौरा नुकताच जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Oct 17, 2015, 10:48 PM IST
मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास title=

मुंबई : मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातला भला मोठ्ठा परदेश दौरा नुकताच जाहीर करण्यात आलाय. 

परदेश मंत्रालय नोव्हेंबर आणि डिसेंबर महन्यात द्विपक्षीय बैठकांच्या तयारीला लागलंय. या प्रस्तावित बैठक पार पडल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 दिवसांत तब्बल 60 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणारे पंतप्रधान ठरतील. 

याचबरोबर पंतप्रधान कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षात सर्वात जास्त परदेशी दौरे करणारे पंतप्रधान म्हणून केलेला आपलाच रेकॉर्ड ते दुसऱ्या वर्षातही कायम करतील. 

परंतु, डिसेंबरच्या मध्यात ते दिल्लीतच असतील कारण या वेळेत जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे भारताच्या दौऱ्यावर असतील. 
 
असा आहे मोदींच्या दौऱ्याचा प्लान...

20 - 21 ऑक्टोबर : भारत - रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मोदी मॉस्कोमध्ये जातील. 

11 नोव्हेंबर : ब्रिटनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर मोदी रवाना होतील. यानंतर तुर्कीमध्ये द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील.

15-16 नोव्हेंबर : अंटाल्यामध्ये जी-20 समिटमध्ये सहभागी होतील.

21 - 22 नोव्हेंबर : एशियन इंडिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी कुआलालम्पूरला जाणार... तिथून ते सिंगापूरला जातील.

30 नोव्हेंबर : यूएन क्लायमॅट चेंज कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी मोदी पॅरिसला जातील. 

उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत 27 देशांचा दौरा केलाय. काही देशांचा दौरा त्यांनी दोनदाही केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.