नवी दिल्ली : भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपीमध्ये लगातार ८ रॅली करणार आहेत. मोदींची पहिली रॅली महोबामध्ये २४ ऑक्टोबरला होणार आहे. पण भाजपची यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील परिवर्तन यात्रा ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
भाजपकडून याची घोषणा करण्यात आली आहे की, ५ नोव्हेंबरपासून परिवर्तन यात्रा ही सुरु होणार असून ती २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. लखनऊमध्ये मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून भाजपचे अध्यक्ष अमित शाह ५ नोव्हेंबरला सहारनपूर येथून परिवर्तन यात्रेला सुरुवात करणार आहे.
६ नोव्हेंबरला उमा भारती आणि केशव प्रसाद मौर्य ललितपूरमधून परिवर्तन यात्रा सुरु करणार असून ८ नोव्हेंबरला बलिया येथून कलराज मिश्र यात्रेची कमान सांभाळणार आहेत. सौनभद्र येथून राजनाथ सिंह परिवर्तन यात्रा सुरु करणार आहेत.