सियाचीन: सणासुदीलाही डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करणा-या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सियाचीनला भेट दिली...
सगळा देश जवानांसोबत खांद्याला खांदा लावून उभा असल्याचा संदेश त्यांनी जवानांना दिला. उंच पर्वतराजी असोत की कडाक्याची थंडी... आपल्या जवानांना काहीही विचलित करू शकत नाही... त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं मोदींनी ट्विटरवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलंय...
दरम्यान, काश्मीरमधल्या पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये दाखल झालेत...
या दौ-यात ते काश्मीरसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. श्रीनगरच्या राजभवनात ते राज्यातल्या विविध घटकांच्या भेटी घेतील आणि मदतकार्याचा आढावा घेतील... केंद्र सरकारनं यापूर्वीच पूरग्रस्त भागासाठी १ हजार कोटींची मदत जाहीर केलीये...
काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांच्या भेटीचं स्वागत केलं असून ४४ हजार कोटींची मागणी केलीये. काश्मीरमधला प्रमुख विरोधी पक्ष पीडीपीनं मात्र या दौ-याचं सावध स्वागत केलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.