नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न होत आहेत पण सरकारची यावर करडी नजर आहे. अनेक ठिकाणांहून पैसे पोलिसांनी पकडले आहेत. पोलिसांनी देशातील तीन वेगवेगळ्या भागातून २ कोटी ५० लाख रुपये जप्त केले आहेत.
ओडिशा पोलिसांनी संभलपूरमधून ८ लोकांना अटक करत त्यांच्याकडून १ कोटी ४२ लाख रुपये जप्त केले आहे. यामध्ये १.४२ कोटी रुपयांमध्ये ८५ लाख ६२ हजार रुपये, ५०० आणि २००० च्या नव्या नोटा आहेत.
सीआरपीएफ चौकात कँट पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना गाडीच्या डिक्कीमध्ये एका बॉक्समध्ये नोटा सापडल्या. जेव्हा गाडीतील लोकांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांना याबाबत माहिती सांगता आली नाही. चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकूण ४९ लाख ७० हजार रुपये पोलिसांनी पकडले.
हिसारमध्ये पोलिसांनी एका हॉटेलमधून ३६ लाख रुपये जप्ते केले. कमिशन घेऊन काळा पैसा पांढरा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.