फेसबुकवर शेअर केला दारुच्या बाटलीसोबत फोटो, 4 जणांना अटक

बिहारमध्ये आता सोशल मीडियावरही कोणी दारुच्या बाटलीसोबत फोटो शेअर केली तर त्याची खैर नाही. नालंदामध्ये अशीच एक घटना समोर आलीये.

Updated: Dec 5, 2016, 02:25 PM IST
फेसबुकवर शेअर केला दारुच्या बाटलीसोबत फोटो, 4 जणांना अटक title=

पाटणा : बिहारमध्ये आता सोशल मीडियावरही कोणी दारुच्या बाटलीसोबत फोटो शेअर केली तर त्याची खैर नाही. नालंदामध्ये अशीच एक घटना समोर आलीये.

एका तरुणाने दारुच्या बाटलीसोबतचा फोटो फेसबुक शेअर केला तसेच त्या फोटोखाली ‘पार्टी ऑल नाइट’ असे स्टेटस लिहिले. हा फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवक तसेच त्याच्या मित्रांवर कारवाई केलीये.

याप्रकरणी विक्की नावाच्या तरुणाला तसेच त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आलीये. विक्कीकडून दारुची बाटलीही जप्त करण्यात आली. बिहारमध्ये अशा प्रकारे दारुच्या बाटलीसोबत फोटो अपलोड केला म्हणून अटक केल्याची पहिलीच वेळ आहे.