सूरत: विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडियांचा भाऊ भरत तोगडियांच्यासह तिघांचा खून करण्यात आला आहे. गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडली आहे.
सूरतच्या वराछा भागामध्ये काही हल्लेखोरांनी भरत तोगडियांवर चाकूनं हल्ला केला, आणि त्यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. ही हत्या का करण्यात आली याबाबत मात्र अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर वराछा भागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना अटक केली आहे. मेहुल भरवाड, लालू भरवाड आणि इमरान अशी या अटक केलेल्यांची नावं आहेत.