अटल बिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं. 

Updated: Mar 27, 2015, 08:19 PM IST
अटल बिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान title=

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं. 

प्रकृतीच्या कारणास्तव वाजपेयींचा त्यांच्या निवासस्थानीच गौरव करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून वाजपेयींच्या निवासस्थानी त्यांना गौरवण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित होते. 

वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीसह त्यांचे सामाजिक योगदान, भारत-पाकिस्तान मैत्री दृढ करण्यासाठी केलेल प्रयत्न आणि साहित्यातील भरीव योगदानाबद्दल वाजपेयींना भारतरत्न जाहीर झाला. पं. मदनमोहन मालवीय यांना 31 मार्च रोजी मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.........

अटलींच्या त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रपतींनी भारतरत्न पुरस्काराने गौरव केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अटलजींच्या घराबाहेर एकच गर्दी केली होती.. 

यावेळी भाजपने दिवाळी साजरी केली. मिठाई वाटण्यात आली. तसंच फटाके फोडण्यात आले. अटलजींसारख्या ऋषीतूल्य नेत्याचा भारतरत्नने सन्मान झाल्याबद्दल भाजप देशभर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.