जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

Updated: May 6, 2017, 04:45 PM IST
जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

अहमदाबाद : कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

विनोद पटेल नामक व्यक्तीनं दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. कथित स्वरुपात ३ जानेवारी रोजी सूरतमध्ये एका वेश्यालयात ते गेले होते. त्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पाच सेक्स वर्करसहीत विनोदलाही अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आयपीसी कलम ३७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कोर्टानं भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० मध्ये शारिरीक यौन शोषणाची प्रकरणं येतात. केंद्र सरकारनं निर्भया गँगरेप प्रकरणानंतर ते आणखी कठोर केले. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, वेश्यावृत्तीच्या खटल्यात सेक्स वर्करच्या ग्राहकालाही या खंडात 'गुन्हेगार' म्हणून पाहिलं जातं. 

पटेलनं आपली बाजू मांडत, आपल्याला कोणत्याही सेक्स वर्कर किंवा पीडितेसोबत पकडलं गेलं नव्हतं... तर बारी येण्याची वाट पाहत असताना आपल्याला अटक करण्यात आली होती... त्यामुळे कोणत्याही पीडितेच्या इच्छेशिवाय देहव्यापारात कोणत्याही व्यक्तीचं शोषण केलेलं नाही, असं म्हटलं. त्यानंतर न्यायालयानं पटेलवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत तो कोमत्याही रॅकेटचा भाग नसल्याचा निर्वाळा दिला.