जालंधर : बुडत्याचा पाय खोलात, तशी सध्या राधे माँची अवस्था झालीय. स्वतःला देवीचा अवतार समजणारी राधे माँ आता आणखी एका वादात अडकलीय. तिने एकाला धमकावल्याचा आरोप होत आहे.
राधे माँनं आपल्याला धमकावल्याचा आरोप जालंधरच्या सुरेंद्र मित्तल नावाच्या व्यक्तीनं केलाय. त्याचा पुरावा म्हणून त्यानं एक ऑडिओ टेप उघड केलीय. एप्रिल महिन्यातलं हे संभाषण असून, त्यामध्ये राधे माँचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय.
राधे माँ आणि सुरेंद्र मित्तल यांच्यातल्या व्हॉट्सअप मेसेजचाही खुलासाही त्यानं केलाय. राधे माँविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करणाऱ्या तरूणीला मित्तल यांनीच मदत केली होती. तसंच पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी तिचं मनोधैर्य उंचावलं होतं.
याची माहिती राधे माँला कळल्यानंतर तिनं मध्यरात्री फोनवरून धमकावल्याचा आरोप मित्तल यांनी केलाय. दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं, ते पाहूयात
पाहा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.