www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांचं नाव निश्चित झालंय. डॉ. डी सुब्बाराव यांची प्रदीर्घ कारकीर्द सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर राजन आरबीआयची सूत्रं स्वीकारतील.
घसरलेला रुपया, महागाई, वाढती महसूली तूट अशी अनेक आव्हानं राजन यांच्यासमोर असणार आहेत. रुपयाची ऐतिहासिक घसरण ही यांपैकी सर्वांत महत्वाची समस्या आहे. सुब्बाराव यांना पुनर्नियुक्तीत रस नसल्याचं म्हणाले होते. त्यांच्या कारकीर्दीचा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत कठीण काळ होता. या काळात रुपयाचं ऐतिहासिक अवमुल्यन झालं आहे.
त्यामुळे सुब्बाराव यांच्याऐवजी राजन यांची नियुक्ती झाली आहे. राजन हे पी. चिदम्बरम यांच्या विश्वासातील मानले जातात. राजन यांच्या नियुक्तीमुळे आरबीआयच्या धोरणांमध्ये फरक पडण्याची शक्यता मात्र कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.