रेल्वेत आता राजकारण नाही फक्त विकास - गौडा

रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले.

PTI | Updated: Jul 8, 2014, 11:50 AM IST
रेल्वेत आता राजकारण नाही फक्त विकास - गौडा title=

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले. रेल्वे अर्थसंकल्प हा भविष्यात देशासाठी फायदेशीर असेल. हे बजेट लोकांच्या फायद्याचे असेल, असे सूचित गौडा यांनी केले.

आज रेल्वे अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येणार आहे. त्यापूर्वी सदानंद गौडा यांनी रेल्वे विकासासाठी हा अर्थसंकल्प असेल असे म्हटले आहे. रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर आपला भर असेल, त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य असेल, असे सांगून प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यासाठी महत्वाची भूमिका घेतल्याचे म्हटले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा महत्वाचा मुद्दा आहे. रेल्वेचा उपयोग हा राजकीय फायद्यासाठी केला गेला आहे. १० वर्षे रेल्वेला खूप काही सोसावे लागले आहे. आता यात बदल नक्कीच दिसेल. रेल्वेला सोशल नेटवर्किंग साइटशी जोडण्याला प्राधान्य असेल, असे दौडा यांनी स्पष्ट केलेय.

गौडा दुपारी १२ वाजता संसदेत आपले पहिले रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रेल्वे बजेटच्या माध्यमातून एनडीए सरकार आपला चेहरा बदलण्यास सुरुवात करु शकणार आहे. या पहिला बजेटमध्ये मोदी सरकार अनेक नविन घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.