रेल्वेने गुपचूप दिला जोरदार झटका, तुम्हांला माहीत आहे का?

रेल्वेने गुपचूप प्रवाशांवर एक आणखी ओझं टाकलं आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता स्पेशल ट्रेनच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. स्पेशल ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये रेल्वे प्रवाशांकडून तात्काळ प्रवासाचे पैसे वसूल करणे सुरू केले आहे. 

Updated: Oct 16, 2015, 02:06 PM IST
रेल्वेने गुपचूप दिला जोरदार झटका, तुम्हांला माहीत आहे का?  title=

मुंबई : रेल्वेने गुपचूप प्रवाशांवर एक आणखी ओझं टाकलं आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता स्पेशल ट्रेनच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. स्पेशल ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये रेल्वे प्रवाशांकडून तात्काळ प्रवासाचे पैसे वसूल करणे सुरू केले आहे. 

अलाहबाद ते जम्मतवी जाणाऱ्या जम्मू स्पेशल ट्रेनपासून याची सुरूवात झाली. या ट्रेनच्या सर्व श्रेणींसाठी तात्काळ तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहे. आता हा नियम सर्व स्पेशल ट्रेनसाठी लागू करण्यात येणार असल्याने सर्व स्पेशल ट्रेनला तुम्हांला तात्काळ तिकीटाचे पैसे द्यावे लागणार आहे. 

फेस्टिवल सीझनमध्ेय रेल्वेकडून दरवर्षी स्पेशल ट्रेन चालविल्या जातात. त्या ट्रेनसाठी प्रवाशांकडून इतर ट्रेनप्रमाणेच तिकीटाचे पैसे घेतले जातात. पण ही व्यवस्था रेल्वेने गुपचूप बदलली आहे. याची माहिती रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांनाही नाही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.