नवी दिल्ली : यशवंतपूर ते बिकानेर दरम्यान आपल्या पॅरालिसीस झालेल्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या पंकज जैन या यांच्या मदतीला स्वत: प्रभू धावून आले. पंकज जैन हे आपल्या वडिलांना उपचाराकरिता मेडतारोड रोड येथे घेऊन चाले होते. पण ट्रेन फक्त 5 मिनिटं थांबणार असल्याने सामानसह ट्रेनमधून उतरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.
पंकज जैन यांना एकाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना ट्विट करून मदत मागण्याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी 6.30 ला सुरेश प्रभू यांना ट्विट केलं आणि मदत मागितली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडूनही ट्विट करून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.
पहाटे 3.15 मिनिटांनी गाडी ही मेडतारोड येथे पोहोचली. तेव्हा त्याठिकाणी स्टेशन मास्टर आणि कुली एका व्हिलचेअरसह तेथे मदतीसाठी उपस्थित होते. त्यादरम्यान 10 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबून राहिली. पंकज जैन यांच्यासाठी एक टॅक्सीही उपलब्ध करून देण्यात आली.
'सरकारी यंत्रनेकडून एवढी मदत मिळेल असं अनपेक्षित होतं. पण खरंच विश्वास नाही होत आहे की त्यांच्याकडून एवढी मदत मिळाली.' असं पंकज जैन यांनी त्यानंतर ट्विट करून म्हटलं आहे. याआधीही रेल्वेमंत्र्यांना ट्विट केल्यानंतर एका महिलेला मदत पाठवली गेली होती.
@DRMJodhpurNWR @GMNWRailway @RailMinIndia I m traveling with my dad who is a paralysis patient. Need an assistance. @dr_asr
— Pankaj Jain (@pankajjain86) November 28, 2015
@pankajjain86 @DRMJodhpurNWR @GMNWRailway @dr_asr @sureshpprabhu Please send PNR or coach number
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 28, 2015
@RailMinIndia @DRMJodhpurNWR @GMNWRailway @sureshpprabhu Thank you so much for all ur help provided to us today morning. Grt initiative.
— Pankaj Jain (@pankajjain86) November 29, 2015
@RailMinIndia in this Cold weather the station master wit staff were waiting for us on platform @DRMJodhpurNWR @GMNWRailway @sureshpprabhu
— Pankaj Jain (@pankajjain86) November 29, 2015
@RailMinIndia wit a wheelchair as my dad is bedridden patient. And everyone did cooperate & @DRMJodhpurNWR @GMNWRailway @sureshpprabhu
— Pankaj Jain (@pankajjain86) November 29, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.