10 वी पास महिलांसाठी रेल्वेमध्ये संधी

रेल्वेमध्ये 10 पास महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल या पदासाठी ही संधी आहे. 

Updated: Feb 5, 2016, 05:31 PM IST
10 वी पास महिलांसाठी रेल्वेमध्ये संधी title=

नवी दिल्ली: रेल्वेमध्ये 10 पास महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल या पदासाठी ही संधी आहे. 

2030 पदांसाठी ही रेल्वे भरती होणार आहे, तर या पदासाठी 2030 जागा आहेत. या जागेसाठी अप्लाय करणाऱ्या महिलांचं वय 18-25 वर्ष असावं असंही रेल्वेनं सांगितलं आहे. 

5,200 ते 20,200 रुपयांपर्यंत या जागेसाठी सिलेक्ट होणाऱ्या महिलांना पगार मिळणार आहे.

या जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षा आणि शारिरिक चाचणी घेऊन करण्यात येणार आहे.