"मोदींबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही"

पंतप्रधानांशी मी संबंध तोडल्याचे जाहीर करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 

Updated: Jun 9, 2015, 01:20 PM IST
"मोदींबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही" title=

नवी दिल्ली : पंतप्रधानांशी मी संबंध तोडल्याचे जाहीर करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी के. व्ही. चौधरी यांची नियुक्ती झाल्यावर जेठमलानी यांनी पंतप्रधानांना नाराजीचे पत्र लिहून आपल्याबद्दल आदर राहिला नसल्याचे म्हटले आहे. 

जेठमलानी यांनी पत्रात लिहिले आहे, की के. व्ही. चौधरी यांची दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी बसण्याची पात्रता नाही. 

आता मी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणार असून, न्यायालय हे भारतातील नागरिकांसाठी आहे.

जेठमलानी यांनी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर पाठिंबा दिला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.