हिस्सार : बाबा रामपालचा जामीन हायकोर्टानं रद्द केला. दुपारी दोन वाजता पंजाब-हरयाणा हायकोर्टात या बाबाला हजर करण्यात येणार आहे. रामपालसह १२ कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे.
तब्बल ३६ तासांच्या हिंसाचारानंतर अखेर हरयाणातला वादग्रस्त बाबा रामपाल याला अटक करण्यात आलीय. बुधवारी रात्री हिस्सार पोलीस सतलोक आश्रमात घुसले आणि त्यांनी या बाबाच्या मुसक्या आवळल्या.
हिस्सारचा वादग्रस्त बाबा रामपाल याला २००६च्या हत्या प्रकरणातला जामीन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं रद्द केलाय. कोर्टानं वारंवार समन्स बजावूनही रामपाल हजर झाला नव्हता. अखेर त्याच्या अटकेचं वॉरंट काढल्यानंतर हिस्सारमध्ये हिंसाचार उफाळला.
तब्बल ३६ तासांच्या संघर्षानंतर CRPFच्या हस्तक्षेपानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज दुपारी २ वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.