28 दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशमधील आसिफ नगला या गावात एका युवकाने 28 दिवसांच्या एका चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Updated: Dec 7, 2015, 06:29 PM IST
28 दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार title=

बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील आसिफ नगला या गावात एका युवकाने 28 दिवसांच्या एका चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

चिमुकलीचे आई-वडील पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी गेले होते. त्यादरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज पांडे यांनी दिली आहे.

घरी परत आल्यावर चिमुकलीची स्थिती पाहून तिला लगेचच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

चिमुकलीच्या वडिलांनी त्याच गावातील युवक नमिनो याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. हा युवक सध्या फरार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.