नवी दिल्ली : प्रदुषणावरील समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजधानी दिल्लीतील सरकारने घेतलेल्या एक दिवस सम आणि एक दिवस विषम नंबर प्लेट असलेली वाहने चालवण्याच्या निर्णयामुळे सरकारला तब्बल १००० कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.
दिल्ली सरकारने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राजधानीत वाहनासाठी करण्यात आलेल्या नव्या निर्णयामुळे कार, मोटार सायकली, तसेच इतर वाहनाच्या पेट्रोल-डिझेल वापरण्याचे प्रमाण निम्मे होईल. यामुळेच पेट्रोल-डिजेलवर राज्यसरकार वसूल करत असलेला कर (व्हॅट) यांचे प्रमाण ही निम्मे होणार असल्याची शक्यता आहे.
कार, मोटार सायकली आणि इतर वाहनाच्या इंधन विकत घेण्याने दरवर्षी राज्याला व्हॅटमुळे २०३२.१२ कोटी रूपये जास्त मिळतात. नविन वाहनासंबंधी नियम लागू केल्यामुळे सरकारला १०१६ कोटीचे रूपयांचे नुकसान होऊ शकते.
त्यासोबतच याविषयी तज्ञांचे मत असे की प्रदूषण कमी झाल्यामुळे आरोग्यविषयक सुविधेवर होणारा खर्च कमी होऊ शकतो.
दिल्लीमध्ये नोंदणीकृत आलेल्या गाड्यांची संख्या ही सर्वात अधिक आहे. दिल्लीत एकूण २८ लाखापेक्षा जास्त कार तसेच ५६ लाखापेक्षा जास्त मोटार सायकली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.