रायपूर : छत्तीसगडमधील रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतात प्रेमी युगूल गप्पा मारत बसलं होतं. ही रात्रीची वेळ असल्याचं सांगण्यात येतंय, यात अचानक एकाने येऊन प्रियकराला गोळी घातली तर, प्रेयसीला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली आहे.
शेतात २४ वर्षीय युवराज चव्हाण रात्री आठच्या सुमारास प्रेयसीला घेऊन छेरीखेडी येथून नवीन रायपूर येथे आला. मेन रोडपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर दूर असलेल्या एका शेतात दोघे गप्पा मारत होते.
या दरम्यान एक जण शेतात आला आणि त्याने प्रियकराच्या पाठीत गोळी मारली, युवराज जागीच गतप्राण झाला, यानंतर तरूणीवर बंदुकीच्या धाकाने शेतात बलात्कार करण्यात आला, या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला, पीडीत मुलगी अल्पवयीन आहे.
तरूणीचा माजी प्रियकरावर संशय आहे, या प्रियकर या तरूणीच्या शेजारीच राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी दारू आणि बिअरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.
हल्लेखोर पळून गेल्यानंतर ही तरूणी रस्त्यावर आली, मोटरसायकल स्वारांना हकीकत सांगितली. या मोटरसायकल स्वारांनी ही माहिती पोलिसांना दिली.यानंतर पोलिस आयुक्त संजीव शुक्ला यांच्या नेतृत्वात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मध्यरात्री नाकाबंदी करण्यात आली.मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती आलेला नाही.