तपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी

तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.

Updated: Jul 1, 2014, 02:51 PM IST
तपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी title=

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.

संसदेत तपस पाल यांच्याविरोधात सीपीआय विशेषाधिकार प्रस्ताव आणणार असल्याचं सीताराम येचुरी यांनी म्हटलंय. नादिया जिल्ह्यातील चौमुहा गावात पाल यांनी ही मुक्ताफळं उधळलीयेत. 

तृणमूल काँग्रेसनंही पाल यांना फटकारलंय. तर पाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्या पत्नी नंदिनी पाल यांनी माफी मागितलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.