आता काँग्रेसचं 'अच्छे दिन आने वाले है'

नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सोशल मीडियाने आता मोदींविरोधात मोहिम सुरू केली आहे.

Updated: Jul 1, 2014, 02:47 PM IST
आता काँग्रेसचं 'अच्छे दिन आने वाले है' title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सोशल मीडियाने आता मोदींविरोधात मोहिम सुरू केली आहे.

केंद्र सरकारला सत्ता सांभाळण्यासाठी एक महिना पूर्ण झाला आहे आणि महागाई थांबवण्याचं नाव घेत नाहीय. 

महागाई आणखी वाढण्याचे संकेत आहेत, कारण आता डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत, यापूर्वी रेल्वेची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्या आधी खताच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या काळात वाढलेल्या महागाईविरोधात सोशल मीडियावर लाट आली होती. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनीही महागाईला मुद्दा बनवला होता. मात्र ती महागाई आता हटण्याचं नाव घेत नाहीय.

सोशल मीडियाच्या सुरूवात अशा वेळी झाली, ज्यावेळी अण्णा हजारे यांचं दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू होतं.

आपचे अरविंद केजरीवाल यांनाही दिल्लीत सत्तेत येण्यासाठी सोशल मीडियाचा फायदाच झाला.

काँग्रेसने आता नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार करतांना 'अच्छे दिन आने वाले है' ला लक्ष्य केलं आहे. मोदींचे समर्थक याला सोशल मीडियावर उत्तरही देत आहेत. 

दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मोदी सरकारपुढे आणखी कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.