राष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Mar 29, 2017, 10:15 PM IST
राष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव शिवसेनेनं पुढे केलं होतं. पण खुद्द मोहन भागवत यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या आणि आपल्याला राष्ट्रपती व्हायचं नाही हे स्पष्ट केलं.

काहीच दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी नागपूरला जाऊन संघ मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चांना आणखी जोर मिळत आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाचीही राष्ट्रपतीपदासाठी चर्चा सुरु आहे. यावर्षी जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे.