बिहारमध्ये रिअल ‘पा’!

काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.

Updated: Aug 27, 2013, 02:10 PM IST

www.24taas.com झी मीडिया, बिहार
काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.
अली खानचं वय हे फक्त १४ वर्ष असलं तरी त्याचं शरीर ११० वर्षाच्या माणसासारखं वाटतं. या आजार असणाऱ्या लोकांचं शरीर एका वर्षातच एवढं भराभर वाढतं की, तो एक वृद्ध व्यक्ती असल्यासारखा वाटतो. अशी व्यक्ती आपल्या सामान्य वयापेक्षा खूप मोठी दिसू लागते.
या आजारानं ग्रासलेली मुलं ही सामान्य मुलांच्या तुलनेत अधिक वेगानं वाढत असतात. पूर्ण जगात फक्त ८० लोक असे आहेत जे ‘प्रोजेरीया’ या आजारानं ग्रस्त आहेत.
अली खानचे वडील नबी हुसेन (५०) आणि आई रजीया (४६) यांचं ३२ वर्षा अगोदर लग्न झालं. त्यांना एकूण आठ मुलं होती, पण रेहना, इकरामुल, रूबिना आणि गुडीया या मुलांना १२ ते २४ वर्षाच्या दरम्यान या आजारामुळं मरण आलं. त्यांचं पाचवं अपत्य हे जन्मानंतर २४ तासांच्या आतच गेलं. आता त्यांच्या केवळ दोन मुलीच सुरक्षित आणि हेल्दी आहेत.
‘प्रोजेरीया’नं ग्रासलेल्या पिडीतांना हार्ट अटॅक आला किंवा निमोनिया झाला तर त्यांचा मृत्यू होतो. हे लोक जास्तीत जास्त फक्त चौदा वर्ष जिवंत राहू शकतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.