नवी दिल्ली : एअरटेलने ४जी सेवा सुरु केल्यानंतर आता रिलायन्स जिओही आजपासून देशभरात ४जी सेवा सुरु करते. आज कंपनीतर्फे त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ४जी सेवा दिली जाणार आहे. कमर्शिेयल लाँच होईपर्यंत कर्मचाऱ्यांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे.
रिलायन्स जिओचा ब्रँड अॅम्बेसिडेर शाहरुख खान ४जी सेवा लाँच करणार आहे. संगीतकार ए.आर. रेहमानही लाँचिग सोहळ्यात उपस्थित राहील. २०१६ मध्ये रिलायन्स जिओ देशभरात ही सेवा सुरु करेल.
कंपनीकडून ५०हून अधिक शहरात रिलायन्स जिओ ४जी हॉटस्पॉट लावणार आहे. ४जी सेवेला एप्रिल-मे पर्यंत मोठ्या स्तरावर लाँच केले जाणार आहे. या सेवेसाठी कंपनीला एप्रिलपर्यंत एक लाख कोटींचा खर्च होईल अशी माहिती आहे.