लालूंच्या पक्षात १३ आमदारांचा बंडाचा झेंडा, तासाभरात ६ परतले

पाटणा नवी दिल्ली लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये बंडाचे झेंडे फडकावले जात आहेत.

Updated: Feb 24, 2014, 07:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाटणा नवी दिल्ली लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये बंडाचे झेंडे फडकावले जात आहेत.
बिहारमध्ये सोमवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या १३ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला.
यात सम्राट चौधरी, अब्दुल गफूर, ललित यादव, इनाम उल हक, राघवेंद्र प्रताप सिंह, दुर्गा प्रसाद सिंह, चंद्रशेखर यांची नावं घेण्यात येत आहेत.
बंडखोर आमदारांनी आपल्या गटाला मान्यता देण्याची मागणी बिहार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
या बंडखोर आमदारांचे नेते सम्राट चौधरी आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे १३ आमदार जनता दल युनायटेडमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे.
राजदचा आणखी एक आमदार बंडखोरी करू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र तीन बंडखोर आमदारांनी आपले सूर बदलले आहेत.
आपल्याला फसवून आपल्या सह्या घेण्यात आल्या, आपण कोणत्याही स्थितीत राजद सोडणार नसल्याचं तीन आमदारांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांशी आपण चर्चा करणार आहोत, बंडखोरी का झाली याची कारणं आपल्याला माहिती नसल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांचे नेते सम्राट चौधरी यांनी म्हटलंय, लालू प्रसाद यादव काँग्रेसच्या मांडीवर बसून खेळतात, आम्ही जनता दल यूनायटेडमध्ये सामिल होणार आहोत, नितिश कुमार ज्या प्रमाणे सांगतील, तशी आमची भूमिका असेल.
बिहार विधानसभेत नितिश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडकडे ११६ आमदार आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे २२ आमदार आहेत.
पक्ष-बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे पक्षात दोन तृतीअंश आमदारांची फूट महत्वाची ठरते.
दुसऱ्या पक्षात सामिल होण्यासाठी बंडखोर गटात १५ आमदार असणे आवश्यक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.