विना पायडलची 'एअर बाईक' चालते ६० किलोमीटर

हवेच्या दाबावर चालणारी एक अद्भूत सायकल तयार करण्याची किमया ओडिशाच्या तेजस्वीनी प्रियदर्शनी हीने केली आहे. १४ वर्षांच्या या मुलीने विना पायडलची एअर बाईक तयार केली असून ती दहा किलो हवेत ६० किलोमीटर चालते. 

Updated: Nov 7, 2016, 06:50 PM IST
विना पायडलची 'एअर बाईक' चालते ६० किलोमीटर  title=

रुरकेला : हवेच्या दाबावर चालणारी एक अद्भूत सायकल तयार करण्याची किमया ओडिशाच्या तेजस्वीनी प्रियदर्शनी हीने केली आहे. १४ वर्षांच्या या मुलीने विना पायडलची एअर बाईक तयार केली असून ती दहा किलो हवेत ६० किलोमीटर चालते. 

एका दहा किलोच्या सिलेंडरमध्ये हवा कम्प्रेस करून भरली जाते. हे सिलेंडर सायकलीच्या मागे  कॅरी केले जाते. 

पेट्रोल, डिझेल, कोळसा, ऑईल, गॅस याचे साठे कमी होत असताना तसेच या इंधनामुळे होणाऱ्या प्रदुषण टाळण्यासाठी जगातील बरेच देश एकत्र येत असताना हा शोध लावण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे. 

सायकल दुरूस्त करण्यासाठी ती सायकल दुकानात गेली असता तेजस्विनीला ही आयडीया आली.  सायकलचे टायरला पडलेली गाठ एका मशिन एअर गनच्या सहाय्याने सोडत होती. तिथेच तीला ही कल्पन सुचली.  ती म्हणाली, एअर गन हे करू शकते तर त्या आधारे सायकलही चालू शकते.  या संदर्भात ती आपल्या वडिलांशी बोलली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तसेच प्रयोग करण्यासाठी साहित्यही आणून दिले. 

या दोघांनी आपल्या घरातील सायकलीवर सर्व प्रयोग केले. त्यांनी हवेने भरलेला सिलिंडर आणला. हा हवेचा दाब चेक करणाऱ्या डायलला जोडण्यात  आला. तसेच एक स्टार्टिंग नॉब आणि सेफ्टी व्हॉल जोडण्यात आला. त्याद्वारे हवा सोडण्यात आली. 

नॉब सुरू केल्यावर सिलिंडरमधील हवा ही पायडलच्या इथे असलेल्या एअरगनमध्ये जात होती. ती एअरगन ही गिअरजवळ ठेवण्यात आली. या ठिकाणी सहा ब्लेड ठेवण्यात आले. ती एअर गन त्या ब्लेडवर हवेचा दाब टाकते आणि मग सायकल पुढे जाते.