राजामौली यांनी घटस्फोटीत महिलेसह मुलाला स्वीकारले

बाहुबली १ आणि आता बाहुबली २ ने यशाचे शिखर गाठल्यानंतर,  बाहुबली २ ने १ हजार कोटीची कमाई केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 03:20 PM IST
राजामौली यांनी घटस्फोटीत महिलेसह मुलाला स्वीकारले title=

हैदराबाद : बाहुबली १ आणि आता बाहुबली २ ने यशाचे शिखर गाठल्यानंतर,  बाहुबली २ ने १ हजार कोटीची कमाई केली आणि निर्मात एसएस राजामौली चर्चेत आला. राजामौली यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी आता समोर येत आहेत. राजामौली यांची पत्नी घटस्फोटीत होती आणि राजामौली यांच्यापेक्षा ती ४ वर्षांनी मोठी आहे.

राजामौली यांच्या पत्नीचे नान रमा आहे, रमा या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एम एम किरावनी यांच्या पत्नी श्रीवल्ली यांची लहान बहिण आहे.राजामौली आणि रमा यांची पहिली भेट झाली तेव्हा रमा विवाहित होत्या. त्यांना एक मुलगाही होता.

२००० साली घटस्फोट झाल्याननंतर मुलाचा ताबा रमा यांनी देण्यात आला. रमा यांच्या कठीण काळात राजामौली त्यांच्याबरोबर होते. यानंतर २००१ साली राजामौली यांनी रमाला लग्नाची विचारणा केली, रमाने होकार दिल्यानंतर त्यांनी लग्न केलं.