...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

सचिन तेंडुलकरला जे करायला तीन वर्ष लागले... ते मेरी कोमनं तीन महिन्यांत करून दाखवलंय. 

Updated: Aug 3, 2016, 11:26 AM IST
...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरला जे करायला तीन वर्ष लागले... ते मेरी कोमनं तीन महिन्यांत करून दाखवलंय. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा मेट्रोच्या मुद्द्यावर बोलताना दिसला... यावेळी तो राज्यसभेत दाखल झाल्यानंतर तीन वर्षांत पहिल्यांदाच बोलताना दिसला.

दुसरीकडे, पाच वेळ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन ठरलेली आणि नुकतीच राज्यसभेत दाखल झालेली मेरी कोमनं मात्र तीन महिन्यांतच सभागृहाला आपल्या आवाजाची दखल घेण्यास भाग पाडलंय. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंग आणि डाएटचा मुद्दा मेरीनं राज्यसभेत उचलून धरला... भले तिला आपला मुद्दा बोलताना अडथळे जाणवत असले तरी तिनं याची तमा बाळगली नाही आणि आपलं म्हणणं सभागृहात ठणकावून मांडलं.