www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या एक महिला आमदार प्रेमप्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या आमदार महोदया प्रियकरासोबत राहत असल्यारचा आरोप त्यांच्याच पती दिलीप वार्ष्णेय यांनी केला आहे. वार्ष्णेय यांनी आमदार लक्ष्मीर गौतम यांना प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आणि प्रचंड गदारोळ घातला. टीडीआय सिटी कॉलनीमध्ये एका फ्लॅटमध्ये त्यांनी मुकुल अग्रवाल या व्यक्तीसोबत लक्ष्मी गौतम यांना पकडले. मुकुल अग्रवालला गौतम यांच्यासोबत रात्री फ्लॅटमध्ये पाहून त्यांनी धिंगाणाच घातला.
दुसरीकडे या प्रकरणात लक्ष्मी गौतम यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, दिलीप वार्ष्णेय यांच्यासोबत त्यांचा विवाह झालेला नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना दोन अपत्येही आहेत. परंतु, आता आपण वेगळे राहत असल्याचे गौतम यांनी सांगितले. दिलीप वार्ष्णेय आपली बदनामी करण्यांचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचेही गौतम म्हणाल्या . मुकुल अग्रवाल हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कामासाठी ते निवासस्थानी आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिलीप वार्ष्णेतय हे बदायु जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. लक्ष्मी गौतम त्यांच्या सोबतच कामाला होत्या. तिथे त्यांच्यात संबंध निर्माण झाले. त्यानंतर चंदौसी येथे ते विवाह न करता लिव्हो इन रिलेशनशिमध्ये सोबत राहू लागले. लक्ष्मी गौतम अनुसूचित जातीच्या आहेत. तर दिलीप हे वैश्य समाजाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत आरक्षित जागेवर लक्ष्मी गौतम वडीलांच्या जातीच्यां आधारावर उमेदवारी अर्ज भरण्यानत यशस्वी झाल्या. त्यानंतर त्या विजयी झाल्या. दिलीप आणि लक्ष्मी यांना दोन अपत्ये आहेत. तसेच लक्ष्मी गौतम यांनी अनेक ठिकाणी पतीच्याव नावाच्या जागेवर दिलीप वार्ष्णेय यांचे नाव लिहीलेले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.