चित्तौडगड : देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक लाडू किंवा पेढ्यांचा प्रसाद चढवतात, पण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सावलिया सेठ मंदिरामध्ये प्रसाद म्हणून तस्कर अफीम ठेवतात.
कृष्णाचं हे देऊळ मध्य प्रदेशचा शेवटचा जिल्हा नीमचपासून 65 किमी दूर राजस्थानच्या चित्तौडगड जिल्ह्यातल्या मंडफियामध्ये आहे. अफीम चढवल्यानं तस्करांना मोठ्या प्रमाणावर नफा होतो, असा तस्करांचा समज आहे, म्हणून हे अफीम चढवलं जातं.
प्रत्येक आमवस्येला या मंदिराची दानपेटी उघडली जाते. तेव्हा या दानपेटीतून दागिने आणि पैशांबरोबरच अफीमही बाहेर काढलं जातं. मागच्यावेळी या दानपेटीतून दोन कोटी 46 लाख रुपयांचं अफिम बाहेर काढण्यात आलं होतं.